Saturday 21 April 2012

महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण विधेयक २०११

"संपकार्याना तुरुंगवास" ह्या आशयाचे आता ' महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण विधेयक २०११ ' अखेरीस शुक्रवारी मंजूर करण्यात आले.यामुळे मंत्रालय,बँक व न्यायालयीन कर्मचारी दुध विक्रेते,स्कूल  बस आणि डॉक्टर यांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केल्यामुळे  थोड्या प्रमाणात लोकांना वेठीस धरण्याला आळा बसेल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नसावी.यामध्ये त्याचे उल्लंघन केल्यास दंड व १ वर्षाचा तुरुंगवास अशी शिक्षा नमूद केली आहे.वास्तविक बघता हे सर्व कर्मचारी आर्थिक द्रिष्टीने व्यवस्थित असताना देखील स्वताच्या वैयक्तिक स्वार्थासाठी जनतेला विनाकारण वेठीस धरत असतात हे लोक सर्वसामान्य लोकांना किती त्रास होतो हे चांगले माहित असूनसुद्धा त्यातील कोणीही धीटपणे इतरांना आपण जे करीत आहोत ते योग्य नाही असे सांगत याचेच आश्चर्य वाटते .सर्व सुविधा असूनही आणखी जास्त कसे मिळेल ह्याचाच फक्त विचार कसे करू शकतात हे समजत नाही.आता हे विधेयक काटेकोरपणे अमलात आणले तर त्याचा जनतेला खरोखर खूप उपयोग होईल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.

Thursday 30 June 2011

Traffic Jamming in all the cities............

 आजकाल प्रत्येक शहरातून वाहतूक व्यवस्था किती खालावली हे नव्याने सांगण्याची जरुरी वाटत नाही.आजच्या वर्तमानपत्रातून  जाहीर झाले की आता शहरावाहातुक खाते रीक्षाचालाकाविरुद्धा कडक कारवाई करणार आहेत .अशा प्रकारचे निर्णय नेहेमी प्रसिद्ध केले जातात .परंतु केवळ ते नावापुरतेच असतात ज्या ज्या वेळी असे प्रसिध्द होते तेव्हा तेवढ्यापुरतेच अधिकारी वर्ग सतर्क असतात पुन्हा येरे माझ्या मागल्या.आपण जर तक्रार केली तर आमच्याकडे staff  कमी असल्यामुळे आम्ही हतबल आहोत परंतु.मला असे वाटते की ज्या खात्याला एखाद्या नियमांचे पालन केले जावे असे खरोखरी वाटत असते किंवा तशी इच्छा असते तेंव्हा ते कसेही करून अमलात आणू शकतात 
                  फार पूर्वी  राजे /महाराजे राज्यातील कारभार जाणून घेण्यासाठी साध्या पोशाखातून राज्यात फेरफटका मारून सामान्य जनतेकडून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांचे नंतर मंत्रिमंडळात त्यासंबंधात चौकशी केली जात असे व कायदा आणि सुव्यवस्था राखली जात असे.कायद्याची अंमल बजावणी चोख ठेवली जात असे. अशी सर्व  कामे बिनबोभाट होत असत.आजचे युग संगणकाचे आहे तरीदेखील आजचे चित्र किती विचित्र आहे.का वरच्या राज्यकर्त्यांना सतत जनतेला ज्यास्तीत ज्यास्त कसा त्रास होईल याचीच ते अतिशय काळजी घेताहेत 
                 का   प्रत्येक वेळी रस्त्यावरच उतरायला पाहिजे?सध्या  सर्वाना चांगले वेतन मिळते.महागाई सर्वजणच भोगत आहेत.परंतु सध्या भ्रष्टाचाराने भयानक रूप धारण केले असताना सामान्य माणूस मात्र सगळ्या सरकारी यंत्रणेकडून क्षुल्लक गोष्टीसाठी पिळला जात आहे.यातून जर सुटका करावयाची असेल तर सर्वांनी निर्भीडपणे ,न घाबरता नियमांचे प्रथम पालन करून अन्यायाविरुद्ध लढले तरच आपला टिकाव लागेल
      .भारत माता की जय ,जय महाराष्ट्र